अक्कलकोट, दि.५ : अक्कलकोट तालुक्यातील सलगर येथे सालाबादाप्रमाणे यंदाच्या वर्षीही श्री जय हनुमान कारहुणी
यात्रा- महोत्सवानिमित्त बैलगाड्या पळविण्याचा कार्यक्रम अपूर्व उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाने संपूर्ण सलगर ग्रामस्थांसह तालुक्याचे लक्ष वेधून घेतले.
या यात्रेला गेल्या ६० वर्षापासूनची परंपरा आहे. सर्व ग्रामस्थ विना भांडण तंटा यात्रा सुरळीतपणे पार पडण्याची परंपरा कायम ठेवली आहे सर्व जाती धर्माचे लोक या यात्रेमध्ये एकत्र येऊन हा कारहुणवी सण मोठ्या भक्ती भावाने साजरा करतात.यावर्षी रविवारपासून विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाला प्रारंभ झाला असून सोमवार यात्रेचा मुख्य दिवस
होता.सकाळपासून हा उत्सव पाहण्यासाठी तालुक्यातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.कारहुणवी यात्रा महोत्सव पहाटे ५ ते सकाळी ११ पर्यंत दंडवत व सकाळी ७ ते दुपारी १२ पर्यंत बैलांची सवाद्य गावातून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर मंदिर परिसरात दुपारी १२ ते सायंकाळी
६ पर्यंत कारहुणवी निमित्त खास बैल गाड्या पळविण्याचा भव्य कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमाला आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले,
हन्नूरचे उपसरपंच सागर कल्याणशेट्टी,युवा नेते उदयशंकर पाटील,आरपीआय तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे, दुधनी बाजार समिती सभापती अप्पू परमशेट्टी, काँग्रेस शहराध्यक्ष रईस टिनवाला,मोतीराम राठोड,सातलींग शटगार, युवा नेते प्रवीण शटगार,उपसरपंच काशिनाथ कुंभार,शिवराज बिराजदार,संजयकुमार डोंगराजे,मल्लिनाथ भासगी,रेवणप्पा बोरगाव,अशोक वरदाळे आदी मान्यवरांनी हजेरी लावली.उद्या मंगळवारी यात्रेची सांगता होणार आहे.या यात्रेत खास परगावहून आलेल्या भक्तांना पिण्याच्या पाण्याची व महाप्रसादची सोय करण्यात आली होती.यात्रा यशस्वी पार पाडण्यासाठी पंच कमिटीचे अध्यक्ष,उपाध्यक्ष व सर्व सदस्यांनी सहकार्य केले.
भारतीय
संस्कृतीचे दर्शन
तालुक्यातील सलगर येथे जय हनुमान कारहुणवी याञेला अनन्य साधारण महत्त्व आहे. यामध्ये महाराष्ट्रसह कर्नाटकातील हजारो भाविक सहभागी होतात. हा उत्सव पाहण्यासाठी नागरिक व महिला वर्ग मोठी गर्दी करतात.या यात्रेला कर्नाटक सीमावर्ती भागात व तालुक्यात खूप मोठे महत्व आहे.