---Advertisement---

आ. भारत भालकेंच्या तब्येतीविषयीच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, त्यांची प्रकृती स्थिर

On: November 27, 2020 12:24 PM
Follow Us:
---Advertisement---

पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार भारतनाना भालके यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. यासंदर्भात सोशल मिडियावर सकाळपासूनच उलटसुलट चर्चा सुरू आहे.  दरम्यान, भारत भालके यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या संदर्भात पसरलेल्या कसल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आ.भारत भालके यांचे पुतणे व्यंकट भालके यांनी केले आहे.

आ. भालके यांना ऑक्टोबरमध्ये कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर उपचार करण्यात आल्यानंतर ते बरे झाले होते. मात्र मागील 8 दिवसांपासून त्यांची तब्येत बिघडल्याने पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आज सकाळपासून त्यांच्या तब्येतीविषयी अफवा पसरल्या आहेत. त्यामुळे या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन व्यंकट भालके यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!