अक्कलकोट,दि.८ : नांदेड जिल्ह्यातील
बोंडार हवेली येथे गावात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्यामुळे बौद्ध समाजातील आंबेडकरवादी युवक अक्षय भालेराव यांची जातीवादी गावगुंडाकडून निघृण हत्या करण्यात आली. पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फसणाऱ्या या निंदनीय घटनेचा निषेध अक्कलकोट येथे गुरुवारी आंबेडकर समाज समूहाकडून भव्य निषेध मोर्चा काढून करण्यात आला.या निषेध मोर्चाची सुरुवात शहरातील ए-वन चौकातून क्रांती स्तंभास अभिवादन करून व भीमसैनिक अक्षय भालेराव यांच्या प्रतिमेस श्रद्धांजली वाहून करण्यात आली. सदरचा निषेध मोर्चा ए वन चौक मार्गे नवीन राजवाडा, बस स्थानक परिसर, विजय कामगार चौक ,कारंजा चौक, कापड बाजारपेठ ,मेन रोड, राजे फत्तेसिंह चौक मार्गे जुना तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला. शहीद भीमसैनिक अक्षय भालेरावच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या, त्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत द्या, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अक्षय भालेराव हत्या प्रकरण जलद गती न्यायालयात चालवावा अशा विविध मागण्यांचे निवेदन पोलीस प्रशासन आणि तहसील प्रशासन यांना देण्यात आले.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे, बसपा तालुकाध्यक्ष विठ्ठल आरेनवरू ,आरपीआयचे शहराध्यक्ष अजय मुकणार,पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे रोजगार आघाडी प्रदेशाध्यक्ष विकीबाबा चौधरी, रत्नाकर गायकवाड ,नागणसूर येथील महादेव चिक्कळ्ळी, चुंगी येथील तुकाराम दुपारगुडे, पत्रकार गौतम बाळशंकर, ज्येष्ठ नेते चंद्रकांत इंगळे ,आरपीआयचे सुरज सोनके,
रासपचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील बंडगर ,भाजपाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मोरे,आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक सागर सोनकांबळे,सैदप्पा झळकी,विजय पोतेनवरु आदींनी यावेळी विचार व्यक्त केले.रासपा व भाजपाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मोरे यांनी निषेध मोर्चास पाठिंबा दिला. या निषेध मोर्चात अक्कलकोट तालुक्यातील व ग्रामीण भागातील हजारो भीमसैनिक व महिला वर्ग, विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते .या निषेध मोर्चासाठी शिवबसव डॉ.
बी. आर आंबेडकर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संदीप मडीखांबे व भीमप्रकाश सामाजिक संस्थाअध्यक्ष शिलामणी बनसोडे भीमसैनिकांनी सहकार्य केले.
अक्षय भालेराव अमर
रहेच्या घोषणा
या मोर्चात उपस्थित भीमसैनिकांची अमर रहे अमर रहे अक्षय भालेराव अमर रहे, अक्षय भालेराव यांच्या मारेकऱ्याना फाशी दया, राज्य सरकारचा निषेध असो अशा व इतर घोषणा दिल्या.जुना राजवाडासमोर निषेध सभा घेऊन निषेध मोर्चाची सांगता करण्यात आली.