---Advertisement---

आ. भारत भालके प्रकृती चिंताजनक? विचारपूससाठी शरद पवार जाणार रुबी हॉस्पिटलमध्ये

On: November 27, 2020 4:53 PM
Follow Us:
---Advertisement---

पुणे: पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांची प्रकृती आता चिंताजनक झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे रुबी हॉस्पिटलमध्ये जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.  यादरम्यान डॉक्टरांनीही प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. भारत भालके यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले. पोस्ट कोव्हिड त्रासामुळे त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी खालावली आहे. ते सध्या व्हेंटिलेटरवर असून आम्ही त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याची माहिती डॉ. परवेझ ग्रँट यांनी दिली.

भारत भालके हे पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांपैकी एक आहेत. सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून आमदार झाले आहेत. मात्र तिन्ही वेळा ते वेगवेगळ्या पक्षातून सभागृहात पोहोचले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत तर भारत भालके हे काँग्रेसमधून भाजपमध्ये जाणार होते, मात्र ऐनवेळी निर्णय बदलून ते राष्ट्रवादीत दाखल झाले. विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजयही मिळवून, हॅटट्रिक केली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!