ध्यास विश्वसार्ह बातमीचा

लोकलमध्ये लहान मुलांसोबत प्रवास करणाऱ्या महिलांना प्रवेश नाही

मुंबई : करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात महिन्यांपासून लोकलसेवा बंद आहे.  राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच मुंबई लोकलमधून महिलांना प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, लोकलमध्ये महिला अनेकदा आपल्या लहान मुलांसोबत प्रवास करताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर  मुंबई लोकलमधून केवळ महिलांना प्रवासाची परवानगी दिलेली आहे. लहान मुलांसोबत प्रवास करणे धोक्याचे ठरत असून फक्त महिलांनाच लोकलमधून प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळं लहान मुलांसोबत प्रवास करणाऱ्या महिलांना आता लोकल प्रवास नाकारण्यात आला आहे.

मुंबईतील मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी रेल्वेने मिशन बिगन अगेन अंतगर्त महिलांना लोकलमधून प्रवासाची मुभा दिली होती. मात्र अनेक महिला या आपल्या लहान मुलांसोबत लोकलमधून प्रवास करतात, ही बाब रेल्वेच्या लक्षात आली. त्यामुळे आता लहान मूल घेऊन प्रवास करणाऱ्या महिलेला लोकल प्रवासाची परवानगी दिली जाणार नाही.

यानुसार मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्टेशनच्या गेटवर एक आरसीएफ जवान तैनात करणार आहे. आरसीएफ जवान महिलांसोबत मुलं नाहीत, याची खात्री करेल. जर त्या महिलेसोबत लहान मुलं आढळून आले, तर त्या महिलेला प्रवासाची परवानगी मिळणार नाही. तिला रेल्वे स्थानकातून पुन्हा घरी पाठवले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!