ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मैंदर्गीत श्री शिवचलेश्वर पालखी महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

 


मैंदर्गी : अक्कलकोट तालुक्यातील मैदर्गी येथील ग्रामदैवत श्री शिवचलेश्वर पालखी महोत्सवानिम्मीत मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
ग्रामदैवत श्री शिवचलेश्वर पालखी महोत्सव दर वर्षाप्रमाणे य्ंदाही उत्तरा नक्षत्राच्या पहिल्या गुरुवारी दि.14 सप्तेंबर गुरुवार रोजी पालखी महोत्सव होणार असुन या पालखी महोत्सवानिम्मीत मंदिरात श्रावण महिन्यापासुन रोज पहाटे श्री स रुद्रभिषेक तसेच पानपुजा धार्मिक कार्यक्रमाबरोबरच दि.1 सप्टेंबर पासुन मंदिरात रोज सायकाळी 8 वाजता श्री शिवचलेश्वर महात्मे आधारीत श्री वेदमुर्ती.संगय्या शास्त्री हिरेमठ यांच्या अमृत वाणीने पुराण प्रवचन चालु आहे मंदिरात रविवार रोजी मंदिरात हेडगी जत्रा पार पडले आहे मंगळवार दिनांक 12 मंगळवार रोजी सायंकाळी 8 वाजता एम एस युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष महेश शावरी यांच्यावतीने शहरातील हजारो महिला सुवासिनींना ओटी भरण्याचे कार्यक्रम होणार आहे आणि रात्री आठ वाजता ओटी भरणे व पुराण मंगलमहोत्सवासाठी आलेल्या सर्व भक्तांना युवा उद्द्योजक सुरेश नागुर यांच्यावतीने तूप करंज्या पोळीचे महाप्रसादचे आयोजन करण्यात आले आहे दिनाक 26 सप्टेंबर मंगळवार रोजी अग्नी महोत्सव होणार आहे तसेच दि. 14 सप्तेबंर गुरवार रोजी सकाळी 8.30 वाजता मंदिरातुन पालखी मिरणुकीला सुरुवात होउन शहराच्या प्रमुख मार्गाने मिरवणुक निघणार असुन या सोहळ्यात शहरातील विविध चोकातील तरुण मंडळाचे कार्यकर्ते लेझीम टिपरी ढोळ्ळ भजन संघ , नृत्य संघ सहभागी होणार आहेत या पालखी महोत्सवात भक्त गणानी सहभागी होण्याचे आव्हान देवस्थान पंच कमिटीने केले आहे
या पालखी महोत्सवानिमित्त मैंदर्गीस शहरातील विविध क्षेत्रात कार्य करणारे छत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश गोब्बुर ,जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड मुलींच्या शाळेचे मुख्याध्यापक महांतेश्वर कट्टीमनी, एम एस युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष महेश शावरी तसेच दहावी आणि बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आहे

नृत्याचा कलाविष्कार
पहायला मिळणार

या पालखी महोत्सवासाठी दोस्ती ग्रुप वतीने प्रथमच केरळ राज्यातील पन्नास हून अधिक कलाकार चेंडी मेळ वाद्य तसेच यथ्यम नृत्य कला सादर करण्यासाठी दाखल होणार आहेत दक्षिण भागातील हे कलाकार असून यथ्यम नृत्य व चेंडी मेळ हे वाद्य हे या पा लखी सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरणार आहे यामुळे सर्व भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सिद्धेश्वर पाटील यांनी आवाहन केले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!