---Advertisement---

अक्कलकोटमध्ये हिरकणी सखी मंचकडून श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात

Follow Us:
---Advertisement---

 

 

अक्कलकोट  : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र

मंडळ यांची सहयोगी संस्था असलेल्या हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने हिरकणी सखी मंच्याकडून श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

 

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले व न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली न्यासाची सहयोगी संस्था असलेल्या हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा अलकाताई जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाच्या महाप्रसादालयात पाळणा कार्यक्रमाने श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

 

यावेळी हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा अलकाताई भोसले, उपाध्यक्षा रत्नमाला मचाले, सचिवा अर्पिताराजे भोसले, माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे, स्मिता कदम, उज्वला भोसले, पल्लवी कदम, राजश्री माने, ललिता वाकडे, क्रांती वाकडे, स्वप्ना माने, पल्लवी नवले, स्वाती निकम, सुवर्णा घाडगे, छाया पवार, रुपा पवार यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या.

 

 

दहिहंडी

उत्सव साजरा

 

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्यावतीने दहिहंडी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. न्यासाच्या मुख्य प्रवेश द्वारासमोर बांधण्यात आलेल्या दहीहंडी गोविंदा पथकाने फोडली. यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त संतोष भोसले यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!