---Advertisement---

अन्नछत्र मंडळातील बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट :(प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली, न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत अनंत चतुर्थीच्या दिवशी न्यासाच्या श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात प्रतिष्ठापना केलेल्या श्रींचे गुरुवार दुपारी २.३५च्या सुमारास न्यासाचे सचिव शामराव मोरे यांच्या हस्ते पूजन करून ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या… अशा नाम गजरात बप्पांचे भावपूर्ण विसर्जन करण्यात आले.

गेल्या ९ दिवसापासून श्रींचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येत होते. शमी वृक्षाखाली गेल्या ३३ वर्षा पूर्वी श्री गणेशाची स्थापना करून सुंदर असे मंदिर व सभामंडप बांधण्यात आले आहे. श्री स्वामी समर्थांच्या पावन भूमीवर श्री शमी विघ्नेश गणेश असल्याने त्याचे स्थान व महात्म्य अलौकिक आहे.

दरम्यान न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, विश्वस्त संतोष भोसले, मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, संजय कुलकर्णी, सोमकांत कुलकर्णी, डॉ.प्रधान, बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, बाळासाहेब घाडगे, सौरभ मोरे, वैभव मोरे, बाबूशा महिंद्रकर, आप्पा हंचाटे, निखिल पाटील, प्रवीण घाडगे, दत्ता माने, राजू पवार, संभाजीराव पवार, मल्लिकार्जुन बिराजदार, प्रसाद हुल्ले, रमेश हेगडे, अनिल गवळी, महांतेश स्वामी, पिंटू साठे, गणेश पाटील, राहुल इंडे, फहिम पिरजादे, योगेश कटारे यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

पुढे वाचा

Leave a Comment

Don`t copy text!