ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भाजपाला धक्का : आमदार किरण माहेश्वरी यांचे निधन

जयपूर :  राजस्थानच्या राजसमंद येथील भाजपाच्या आमदार किरण माहेश्वरी यांचे कोरोनामुळे निधन झाल्याचे समोर आले आहे. नुकताच त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. या अगोदर सहाडा येथील आमदार कैलाश त्रिवेदी यांचे देखील कोरोनामुळे निधन झाले आहे.

आमदार किरण माहेश्वरी महापालिका निवडणूक प्रचारादरम्यान कोटा येथे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळल्या होत्या. त्यांना कोटा उत्तर महापालिका निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी सोपण्यात आली होता. मागील काही दिवसांपासून हरियाणा येथील गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात आमदार किरण माहेश्वरी यांच्यावर उपचार सुरू होते. त्या राजस्थानच्या दुसऱ्या आमदार ठरल्या आहेत, ज्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!