ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आगामी निवडणूक भाजपसाठी नव्हे तर भारतासाठी महत्वाची : फडणवीस !

पुणे : वृत्तसंस्था

देशभर आगामी लोकसभा निवडणुकीचा जोर वाढत आहे अनेक पक्ष कामाला देखील लागले असून त्याचे पडसाद आता राज्यात देखील उमटू लागले आहे तर पुणे दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी देखील निवडणुकीबाबत मोठे भाष्य केले आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कि, आगामी निवडणूक भाजपसाठी नाही तर भारतासाठी महत्त्वाची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला पुढे नेले आहे, त्यामुळे २०२४ ते २०२९ हा काळ भारतासाठी निर्णायक असणार आहे. जिथे मित्रपक्ष लढतील तिथे त्यांच्या पाठीमागे आपल्याला उभे राहायचे आहे. सर्व मतदारसंघात आणि सर्व बूथवर भाजप मजबूत करायचा आहे. यासाठी सर्वांनी ध्येय समोर ठेवून काम करावे, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
भारत विश्वचषक हरला, कारण तेथे नरेंद्र मोदी आले होते. त्यामुळे पनवती लागली, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली होती. यावर देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे. नरेंद्र मोदी यांच्यामुळे भ्रष्टाचारी लोक भयभीत आहेत. त्यामुळे त्यांना मोदींबाबत तसं वाटत असेल. मात्र, सामान्य लोकांसाठी नरेंद्र मोदी मसिहा आहेत. मोदी हेच देशाचे रक्षक आहेत. राहुल गांधी यांना त्यांचा पक्षदेखील गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे लोकदेखील त्यांना गांभीर्याने घेत नाहीत, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!