---Advertisement---

१३ वर्षीय मुलाने घेतला टोकाचा निर्णय : मोहोळ तालुक्यात खळबळ !

By team
On: March 2, 2026 3:21 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : वृत्तसंस्था

मोहोळ तालुक्यातील पेनुर येथे १ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास १३ वर्षीय मुलाने पालकांनी मोबाईल वापरायला न दिल्याने राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यशराज धर्मराज डोके असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेनंतर मुलाच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहोळ तालुक्यातील पेनुर येथे धर्मराज डोके हे कुटुंबासोबत राहून शेती करून उपजीविका करतात. १ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजण्यापूर्वी राहत्या घरी यशराज डोके याने मोबाईल वापरण्यास का दिला नाही? म्हणून स्वतःहून राहत्या घरात साडीच्या साह्याने गळफास लावून घेतला होता. दार आतमधून लॉक असल्याने तो घराची कडी का उघडत नाही? म्हणून कुटुंबीयांनी लोखंडी रॉड घालून कडी तोडली. गळफास घेतलेला दिसला. त्याला तात्काळ पेनुर येथील खाजगी रुग्णालयात व त्यानंतर मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.

रुग्णालयात पोचल्यानंतर डॉक्टरांनी तपासून त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. दरम्यान या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून मृत मुलाच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!