ध्यास विश्वसार्ह बातमीचा

हिवाळ्यातील आजारांवर हे ‘काढे’ देणार मात !

मुंबई : वृत्तसंस्था

सन २०१९ मध्ये जगभर कोरोनाचा हाहाकार सुरु असतांना देशात देखील हे संकट आले होते. यावेळी अनेक राज्यातील आयुवेदिक काढा मोठ्या प्रसिद्धीस आला होता. आता बदलत्या ऋतूमध्ये सर्दी, खोकला अशा समस्या नेहमीची उद्भवतात. यामुळे घसादुखी आणि वायरल फ्लूची समस्याही वाढते. याशिवाय हवामानातील बदलामुळे काही लोकांना पचनाच्या समस्याही होतात. या मौसमी आजारांपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही आयुर्वेदिक उपचारांचा अवलंब करू शकता. यासाठी तुम्ही घरी काही काढे तयार करून ठेवू शकता.

तुळस
कढईत पाणी उकळा. आता तुळशीची पाने, 1 टीस्पून काळी मिरी, 1 टीस्पून दालचिनी पावडर आणि 1 टीस्पून किसलेले आले घाला. हे मिश्रण चांगले मिसळा. 10-15 मिनिटे उकळू द्या. यानंतर गाळून घ्या. ते थंड झाल्यावर प्यावे. हे इम्युनिटी बूस्टरचे काम करते. ज्यामुळे आपण सर्दी आणि खोकला टाळतो येते. याशिवाय पचनक्रियेसाठीही हा काढा फायदेशीर आहे.

गिलोय
हा काढा बनवण्यासाठी 1 चमचा गिलॉय बारीक करून घ्या. यानंतर ते पाण्यात मिसळून उकळवा. हा काढा आपल्याला वायरल फ्लू सोबत लढण्यास मदत करतो.

दालचिनी
हा काढा बनवणे अगदी सोपे आहे, बनवण्यासाठी एका कढईमध्ये एक-दोन कप पाणी घाला. आता त्यात दालचिनी पावडर घाला. हे मिश्रण चांगले उकळवा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात एक चमचा मधही मिसळू शकता. शरीराची ताकद वाढवण्यासोबतच ते तुम्हाला मौसमी आजारांपासून वाचवण्यास मदत करते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!