ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मोदी सरकारचं काऊंटडाऊन सुरु – पटोले

मुंबई : वृत्तसंस्था

दादर येथे संविधान दिवसानिमित्त कॉंग्रेसने संविधान बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी राजकीय वक्तव्य केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

पटोले म्हणाले कि, संविधानाला २०१४ पासून ग्रहण लावण्याचे काम भाजपाने सुरु केले आहे. लोकशाहीच्या चारही स्तंभांना कमजोर करण्याचे काम सुरु आहे. प्रशासकीय यंत्रणेत परिक्षा न घेता आरएसएस विचारांच्या लोकांची नेमणूक केली जात आहे. लोकशाही मार्गाने आलेली सरकारे ईडी, सीबीआयच्या माध्यमातून पाडली जात आहेत. न्याय व्यवस्थेतही न्यायाधीशांच्या नेमणूकीत हस्तक्षेप केला जात आहे. ज्या मनूने चातुर्वण्याचा पुरस्कार केला त्याचा पुतळा राजस्थानच्या हायकोर्टात उभा आहे तो आधी तेथून काढण्यात यावा अशी मागणी कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेच्या 26 जागा लढविणार आहे यावर प्रतिक्रीया देताना नाना पटोले यांनी मोदी सरकारचं काऊंटडाऊन सुरु झालं आहे. कितीही जागा वाटप करा काही उपयोग नाही. कॉंग्रेस आघाडीच्या जास्त जागा निवडून येतील असा दावाही पटोले यांनी यावेळी केला आहे. लवकरच आम्ही महाविकास आघाडीच्या जागावाटपाकरीता बसून चर्चा करणार असल्याचेही पटोले यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!