सोलापूर : वृत्तसंस्था
५३ वे राज्यस्तरीय श्री सिध्देश्वर कृषी, औद्योगिक, वाहन व पशु-पक्षी प्रदर्शन ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यात्रेनिमित्त श्री सिध्देश्वर देवस्थान यात्रा समितीच्यावतीने २८ डिसेंबर २०२३ ते १ जानेवारी २०२४ या कालावधीत होम मैदान येथे भरविण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कृषी विभाग, आत्मा, जिल्हा परिषद सोलापूर, महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या विशेष सहकार्याने व स्मार्ट एक्स्पो ग्रुपच्या व्यवस्थापनांतर्गत हे कृषी प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. यात तीनशेहून अधिक शेतीविषयक कंपन्यांचा सहभाग राहणार आहे. महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या सर्व योजनांची माहिती देणारी दालने, व्हर्टिकल गार्डनचे लाईव्ह प्रात्यक्षिक, सेंद्रिय शेतीचे विशेष दालन, होम गार्डन किटचे लाईव्ह प्रात्यक्षिक, पशु-पक्षी प्रदर्शन, भाजीपाला रोपवाटिका व विविध दुर्मिळ अशा प्रजातींची दालने, दुर्मिळ देशी ५०० हून अधिक बियाणे पाहता येणार आहे. यावेळी सिध्देश्वर बमणी, गुरुराज माळगे, मल्लिकार्जुन कळके, विजयकुमार बरबडे, सोमनाथ शेटे उपस्थित होते.