---Advertisement---

जीवे ठार मारण्याची धमकी देत पिता-पुत्रास कोयत्याने मारहाण

By team
On: November 28, 2023 9:25 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

शहरातील थोरली ईरण्णा वस्ती परिसरात मागील भांडणाचा राग काढून फिर्यादी व त्यांच्या वडील भाऊ आई यांना खल्लास करतो असे म्हणत रॉड व कोयत्याने मारहाण केली. तसेच महिलांच्या अंगावर विटा फेकून मारल्या. या मारहाणीत फिर्यादीच्या आईच्या गळ्यातील दीड तोळ्याचे गंठण हरवले. याबाबत सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील थोरली ईरण्णा वस्तीतील रहिवासी मन्सूर मोहद्दिन शेख यांना काल रात्री १.४५ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी जमीर मोहद्दिन पटेल, मसूर निसार शेख, मंजूर निसार शेख, अल्तमश अहमद पटेल (सर्वजण रा. थोरली ईरण्णा वस्ती यांनी फिर्यादी, त्यांचे वडील, भाऊ, आई यांना खल्लास करतो असे म्हणत कोयत्याने पाठीत व हाताला तसेच फिर्यादीच्या आई हलीमा शेख यांनी मारहाण केली. अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल यलगुलवार हे करत आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!