ध्यास विश्वसार्ह बातमीचा

गोकुळ शुगरची ऊस गाळपात मोठी आघाडी, दीड लाख मेट्रिक टनाचा आकडा पार !

 

अक्कलकोट, दि.२८ : वाढीव ऊस दरामुळे जिल्ह्यात सध्या चर्चेत असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ शुगरने आज घडीला यशस्वीरत्या दीड लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा आकडा पार केला आहे त्यामुळे कर्मचारी तसेच शेती विभागाच्या अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. अधिकाधिक गाळप करून कारखान्याची वाटचाल उच्चांकी गाळपाकडे होणार असल्याचा मनोदय यावेळी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.हे उद्दिष्ट पार करण्यासाठी अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांच्या पाठीमागे आपले बळ भक्कम स्वरूपात उभे असल्याचे चेअरमन दत्ता शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले.यावर्षी गळीत हंगामात येणाऱ्या उसाला प्रति टन पहिला हप्ता २८०० रुपये जाहीर करण्यात आलेला आहे.पहिल्या पंधरवड्यातील सर्व उस बीले देखील त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत.
पहिला हप्ता २८०० रुपये जाहीर केल्याने शेतकऱ्यांचा कल हा गोकुळ शुगरकडे वाढल्याचे शेती विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.सध्या कारखान्यावर मोठ्या प्रमाणात ऊस दाखल होत असून हजारो टन ऊस वेटिंग मध्ये असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. सध्या ऊस मोठ्या प्रमाणात गोकुळ शुगरकडे उपलब्ध आहे परंतु टोळ्यांची कमतरता
भासत आहे अशी स्थिती आहे सारखे शेतकरी फोन करत आहेत त्यामुळे उपलब्ध टोळ्यानुसार शेतकऱ्यांचा ऊस उचलण्यात येत आहे शेतकऱ्यांनी काळजी करू नये, त्यांचा संपूर्ण ऊस गाळप केल्याशिवाय कारखाना बंद होणार नाही.शेतकऱ्यांनी निश्चित रहावे,असे आवाहन गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे यांनी केले आहे. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन विशाल शिंदे, मॅनेजिंग डायरेक्टर कपिल शिंदे,एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर प्रदीप पवार,कार्तिक पाटील, अभिजीत गुंड, उमेश पवार यांच्यासह कारखान्यातील विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने
उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!