ध्यास विश्वसार्ह बातमीचा

झिका व्हायरसने वाढविले टेन्शन : काय आहेत लक्षण ?

कोल्हापूर : वृत्तसंस्था

देशातील अनेक राज्यात विविध प्रकारचे आजार सुरु असतांना आता राज्यात देखील झिका व्हायरसचा प्रभाव वाढू लागला आहे. नुकतेच कोल्हापूर जिल्ह्यात या व्हायरसने टेन्शन वाढविले आहे. झिका व्हायरसचे ६ रुग्ण आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. कोल्हापुरात झिका आजाराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील 1,494 नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.

या तपासणीत तापाचे 6 रुग्ण आढळले आहेत. सर्वांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात येत आहेत. कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे 392 घरांचे सर्वेक्षण झाले आहे. यात 243 गरोदर मातांची तपासणी करण्यात आली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरात घरोघरी सर्वेक्षण मोहीम राबवण्यात येत आहे.

ताप आल्यास त्वरित सरकारी दवाखान्यांमध्ये जाऊन उपचार घ्या. सरकारी दवाखान्यांमध्ये मोफत उपचार उपलब्ध आहेत. तसेच झिकाची लागण झाल्यास रुग्णालयात दाखल होण्याची गरज नाही. झिकामुळे मृत्यूचे प्रमाण देखील अत्यल्प आहे.

झिकाची लक्षणे सौम्य स्वरुपाची असतात. झिकाची लागण झालेल्या व्यक्तीमध्ये लक्षणे दिसण्याचं प्रमाण अत्यल्प आहे. ताप, त्वचेवर लाल ठिपके, सांधेदुखी, डोळे लाल होणे साधारण अशी लक्षणे दिसतात. लक्षणे साधारणपणे दोन-तीन दिवसांपासून आठवडाभर टिकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!