---Advertisement---

गॅस पाईपलाईन फुटली अन १० गाड्या जळून खाक !

By team
On: November 29, 2023 9:13 AM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

पुण्यात दोन ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत. कोंढवा आणि नऱ्हे भागात भीषण लागली. कोंढव्यात गॅस पाईपलाईन फुटली तर नऱ्हेत १० गाड्या जळून खाक झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कोंढवा परिसरात गॅस पाईपलाईन फुटली आहे. रस्त्यावर खोदकाम सुरु होते यावेळी एमएनजीएल गॅस पाईपलाईन फुटली. त्यामुळे मोठी आग लागली होती. नऱ्हे भागात देखील आगीची घटना घडली आहे. अंबामाता मंदिराजवळ परफेक्ट ऑटो गॅरेज जळून खाक झाले. गॅरेजमध्ये १० गाळ्या जळून खाक झाल्या. मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!