ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जेवण महागणार : कांदे, टोमॅटोच्या दरात वाढ !

मुंबई : वृत्तसंस्था

कांदे आणि टोमॅटोच्या भावात वाढ झाल्यामुळे नोव्हेंबर २०२३ मध्ये घरगुती सामान्य शाकाहारी आणि मांसाहारी थाळ्यांच्या किमतीत मासिक आधारावर वाढ झाली. देशांतर्गत मानक संस्था ‘क्रिसिल एमआय अँड ए रिसर्च’ने बुधवारी जारी केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, कांदे आणि टोमॅटोंच्या किमती मासिक आधारे अनुक्रमे ५८ टक्के व ३५ टक्के वाढल्याने त्यामुळे भोजन थाळ्यांच्या किमतीतही वाढ झाली. सणासुदीची वाढलेली मागणी व अनियमित पाऊस यामुळे उत्पादनात घट झाल्यामुळे कांदे व टोमॅटोच्या दरात वाढ झाली आहे. आधारावर अनुक्रमे ९३ टक्के आणि १५ टक्के वाढल्या आहेत. त्यामुळे शाकाहारी थाळीची वार्षिक आधारावरील किंमत नऊ टक्के वाढली. डाळींच्या किमती वार्षिक आधारावर २१ टक्के वाढल्या आहेत. त्यांचे शाकाहारी थाळीच्या किमतीतील योगदान नऊ टक्के आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!