---Advertisement---

अभिनेत्री अँजेलिना हॉलिवूड सोडण्याच्या तयारीत ?

By team
On: December 7, 2023 11:32 AM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

हॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये अँजेलिना जोलीचे नाव आवर्जून घेतले जाते. तिच्या चाहत्यांची संख्या काही कमी नाही. सध्या ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. काही काळापूर्वी तिने ब्रॅड पिटपासून घटस्फोट घेतला.

आता अँजेलिना ही हॉलिवूड सोडण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. अँजेलिनाने अलीकडेच मीडियाशी संवाद साधला आहे. तिने यावेळी खुलासा केला की, ती लॉस एंजेलिसमधून बाहेर पडण्याचा विचार करत आहे. ब्रैड पिटपासून घटस्फोट आणि तिच्या कुटुंबाशी संबंधित कायदेशीर लढाईमुळे ती एलए सोडण्याचा विचार करत आहेत. जर तिला आज तिला तिच्या करिअरची सुरुवात करायची असती तर ती अभिनेत्री बनली नसती. जेव्हा तिने अभिनय करायला सुरुवात केली तेव्हा गोष्टी वेगळ्या होत्या. आजच्या काळात तिला अभिनय करायला नक्कीच आवडेल; पण त्यात ती कधीच करिअर करणार नाही.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!