ध्यास विश्वसार्ह बातमीचा

लसणाच्या मदतीने ‘या’ समस्येला देणार मात !

मुंबई : वृत्तसंस्था

प्रत्येक व्यक्तीच्या घरातील किचनमध्ये असलेल्या अनेक वस्तू आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्यातील एक म्हणजे लसणाला आयुर्वेदात सगळ्यात शक्तीशाली जडी-बुडींपैकी एक मानलं जातं. लसणाच्या मदतीने आरोग्यासाठी अनेक समस्या दूर करता येतात. बरेच लोक आजही कोलेस्ट्रॉल आणि हृदय रोगासाठी लसणाचा वापर करतात.

लसणाच्या सेवनाने तसे तर अनेक फायदे होतात. मात्र, जर तुम्ही याचा योग्य वापर शिकले तर तुम्हाला अधिक जास्त फायदा होऊ शकतो.
आयुर्वेद डॉक्टर चैताली राठोड यांनी सांगितलं की, बऱ्याच लोकांना लसणाचा योग्य कसा करायचा हे माहीत नसतं. डॉक्टरांनी सांगितलं की, लसूण कधी अख्खा गिळायचा नसतो किंवा भाजीतही तो अख्खा टाकू नये. डॉक्टरांनी लसणाचा योग्य वापर कसा करायचा हे सांगितलं आहे.

आयुर्वेदात लसण खाण्याची योग्य पद्धत
डॉक्टरांनी सांगितलं की, लसण कधीच अख्खा खाऊ नये किंवा गिळू नये. याच्या वापराची योग्य पद्धत याला बारीक करून किंवा कापून खाण्यात आहे. याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे यात आढळणारं तत्व एलिसिन आहे. ज्याला बारीक केल्यावरच याची शक्ती वाढते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!