---Advertisement---

आता नेते पटेलांवर देखील कारवाई व्हावी ; दानवेंचे गृहमंत्र्यांना पत्र !

By team
On: December 8, 2023 3:45 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून अजित पवारांनी काढता पाय घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक चर्चा रंगू लागल्या होत्या. आता नवाब मालिक यांच्याबाबत अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता प्रफुल्ल पटेल देखील चर्चेत आले आहे. आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांचे कुख्यात डॉन दाउदशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करत थेट उपमुख्यमंत्री व गृहमंत्री यांना पत्र लिहीत जाब विचारला.

पत्रात दानवे यांनी फडणवीस यांना लिहले ही, विधानसभा सदस्य नवाब मलिक यांच्याबाबत आपण व्यक्त केलेल्या तीव्र भावना वाचून आनंद झाला. नवाब मलिक यांचे देशद्रोह्यांशी संबंध असल्याने त्यांना अजित पवार यांच्या सत्ताधारी बाकावर बसण्यास आपण विरोध केला. आपण नैतिकता व राष्ट्रवाद याबाबत किती पक्के आहात हेच यातून दिसले. पण अजित पवार गटाचे राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल हे अलीकडेच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना भेटल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले. गोंदिया विमानतळावर मधल्या काळात पटेलांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. याच पटेल यांचे दाऊद व त्याच्या हस्तकांशी संबंध आहे. दाऊदच्या खास हस्तकाकडून पटेल यांनी आर्थिक व्यवहार केल्याने ‘ईडी’ने पटेल यांची संपत्ती जप्त केली आहे. नवाब मलिक यांच्याबाबत आपल्या ज्या तीव्र भावना आहेत. तशाच भावना प्रफुल्प पटेल यांच्याबाबत आहेत काय? याचा खुलासा आपल्याकडून होणे गरजेचे आहे. तरी याबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी, अशी आशा बाळगतो, असेही दानवे यांनी फडणवीस यांना पत्रातून म्हटले. त्यामुळे नवाब मलिकनंतर आता अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल हेही विरोधकांच्या रडारवर आले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!