मेष – आजचा दिवस लाभदायक ठरू शकतो. रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता असून आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. मुलांच्या यशामुळे मन प्रसन्न राहील. मात्र अनोळखी व्यक्तींच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका.
वृषभ – आज दानधर्म आणि गरजूंची मदत करण्याची संधी मिळेल. जुन्या आर्थिक अडचणी दूर होऊन अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील गोष्टी बाहेरील व्यक्तींना सांगणे टाळा. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या.
मिथुन – नोकरीच्या नवीन संधी मिळण्याचे संकेत आहेत. महत्त्वाचे काम पूर्ण करण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. आर्थिक लाभामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा.
कर्क – आज करिअरमध्ये प्रगतीच्या नवीन संधी मिळू शकतात. महत्त्वाच्या निर्णयात आईचा सल्ला फायदेशीर ठरेल. नोकरी आणि व्यवसायात तुमचा प्रभाव वाढेल. आत्मविश्वासाने काम केल्यास चांगले परिणाम मिळतील.
सिंह – आज संयम आणि समजूतदारपणाने काम करण्याची गरज आहे. गरजू व्यक्तीला मदत करण्याची संधी मिळेल. आर्थिक व्यवहार आणि भागीदारी करताना सावध राहा. मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य विचार करा.
कन्या – आज आर्थिक परिस्थिती समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. जमीन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांना नवीन संधी मिळू शकते. आई-वडिलांचे सहकार्य लाभेल. नवीन योजनांमध्ये यश मिळाल्याने आत्मविश्वास वाढेल.
तूळ – आजचा दिवस विशेष लाभदायक ठरू शकतो. व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. छोट्या प्रवासातून फायदा होऊ शकतो. वैवाहिक जीवनात आनंद आणि समाधान राहील. रखडलेली कामे मार्गी लागतील.
वृश्चिक – आज संयमाने आणि शांतपणे काम करा. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी किंवा सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो; मात्र खर्चही वाढू शकतात. आपल्या महत्त्वाच्या योजना इतरांना सांगणे टाळा.
धनु – आज प्रवासाचे नियोजन करताना काळजी घ्या. काही कामांमध्ये अडथळे येण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहारात निष्काळजीपणा टाळा. पोटाच्या तक्रारी जाणवू शकतात. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या.
मकर – आज बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. तुमच्या शब्दांमुळे जवळच्या व्यक्ती नाराज होऊ शकतात. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात रुची वाढेल. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होण्याचे संकेत आहेत.
कुंभ – आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्य आणि मनःस्थिती चांगली राहील. नातेवाईक आणि मित्रांकडून महत्त्वाच्या कामात सहकार्य मिळेल. नवीन संपर्क भविष्यात फायदेशीर ठरू शकतात. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवाल.
मीन – आज काही कामांमध्ये अपेक्षित यश मिळवण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. कौटुंबिक वातावरणात मतभेद होण्याची शक्यता आहे. अभ्यास आणि कामात मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करा. आरोग्याची काळजी घ्या आणि आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करा.











