नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही महिन्यापासून कांदा प्रश्नाने शेतकरी हैराण झाले असतांना आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांद्याच्या प्रश्नावर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. यावेळी केंद्र सरकार लवकरच कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सकारात्मक निर्णय घेईल, असे आश्वासन पियुष गोयल यांनी फडणवीसांना दिले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्टिटवरुन माहिती दिली आहे. तर कांदा प्रश्नावर सोमवारी दिल्लीत महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती आहे.
कांदा प्रश्नावर सोमवारी दिल्लीत महत्त्वाची बैठक होणार आहे. मंत्री पीयुष गोयल यांच्यासोबत होणार बैठक होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह नाशिकमधील व्यापारी बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. केंद्राने कांदा निर्यात बंदी केल्याने जिल्ह्यातील कांदा लिलाव बंद आहेत. यामुळे राज्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. ठिकठिकाणी रस्ता रोको, आंदोलने केली जात आहेत. तर तातडीने ही कांदा निर्यात बंदी हटवण्याची मागणी शेतकरी करत आहेत. त्यामुळे दिल्लीत होणाऱ्या बैठकीत काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
कांदा निर्यातबंदीनंतर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांचे गोयल यांना भेटून निवेदन दिलं. सह्याद्री अतिथीगृहावर पियुष गोयल आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. देवेंद्र फडणवीसांनी स्वत: ही माहिती दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, शेतकरी बांधवांचे महत्त्वाचे प्रश्न कांदा, कापूस व सोयाबीन या विषयांवर केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्यासह एक सकारात्मक बैठक सह्याद्री अतिथी गृह मुंबई येथे झाली. पियुष गोयल यांनी शेतकरी हिताचे सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन या बैठकीत दिले.