ध्यास विश्वसार्ह बातमीचा

व्यापाऱ्यांमध्ये पडली फूट : कांदा लिलाव होणार पूर्ववत !

नाशिक : वृत्तसंस्था

राज्यातील कांदा बाजार पेठ म्हणून नाशिक शहराला मानले जाते. केंद्र सरकारच्या निषेधार्थ कांदा व्यापाऱ्यांनीबेमुदत संप पुकरला होता. त्यातच पहिल्याच दिवशी म्हणजे शनिवार ९ डिसेंबर रोजी व्यापाऱ्यांमध्ये फूट पडली होती. नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव उद्यापासून पूर्ववत होणार आहे.

नाशिकमधील पिंपळगाव आणि विंचूर बाजारसमितीमध्ये लिलाव सुरु होणार आहे. जे व्यापारी सलग 3 दिवस लिलाव बंद ठेवतील त्यांचे परवाना रद्द करण्याचा सहकार विभागाने इशारा दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर कांदा लिलाव पुन्हा सुरु होणार आहेत. केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याने याचे पडसाद आता राज्यभरात उमटताना पाहायला मिळाले. 1 मार्च 2024 पर्यंत कांदा निर्यातबंदी राहणार असल्याचे परिपत्रक सरकारकडून काढण्यात आले असून, यामुळे शेतकरी आक्रमक झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. बीड , नाशिक , अहमदनगर जिल्ह्यात याचे सर्वाधिक परिणाम जाणवत असून, शेतकरी आक्रमक झाले. तर, काही ठिकाणी कांद्याचा लिलाव देखील बंद पाडण्यात आले.

केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यानं शेतकरी आणि व्यापारी दोघांमध्ये उद्रेक झाल्याचं पाहायला मिळालं. शुक्रवारी ठिक-ठिकाणी आंदोलनं झाल्यानंतर लिलाव बंद करण्याची हाक कांदा व्यापाऱ्यांनी दिली होती.त्यानंतर जिल्ह्यातील बाजार समितीत प्रतिसाद मिळाला. काही शेतकरी 60 ते 70 किलोमीटर अंतर पार करून चांदवड, पिंपळगाव बाजार समितीत जाऊन नाशिक बाजार समितीत पोहचले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!