ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात : दोघे सख्खे भाऊ ठार !

पुणे : वृत्तसंस्था

भरधाव इनोव्हा कारने सख्ख्या भावांना चिरडल्याची घटना पुणे-सोलापूर महामार्गावरील दौंड तालुक्यातील केडगाव येथे रविवारी रात्री आठ वाजता घडली. दोघेही रस्ता ओलांडत असताना ही घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की, इनोव्हा कारने दोघांनाही दूरपर्यंत फरफटत नेले. त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे केडगावमध्ये शोककळा पसरली आहे. कैलास शेळके (वय ५८) व पांडुरंग शेळके (वय ५५, दोघे रा. देशमुख मळा, केडगाव, ता. दौंड) अशी मृतांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कैलास आणि पांडुरंग हे दोघे सख्खे भाऊ असून, कामानिमित्त रविवारी रात्री आठ वाजता ते सहयाद्री पत्रा कंपनीसमोरून पुणे-सोलापूर महामार्ग ओलांडत होते त्यावेळी लाल रंगाच्या भरधाव इनोव्हा कारने दोघांनाही धडक दिली. यानंतर कारचालकाने दोघांनाही लांबपर्यंत फरफटत नेले. ग्रामस्थांनी तत्काळ मदत करत त्यांना यवत ग्रामीण रुग्णालयात हलवले. परंतु, त्यांना तेथे मृत म्हणून घोषित करण्यात आले. घटनेनंतर कारचालक फरारी झाला आहे. कैलास शेळके यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी आहे. तर, पांडुरंग शेळके यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. पांडुरंग शेळके हे नागेश्वर विकास सोसायटी केडगावचे सचिव गणेश शेळके यांचे वडील होत. कारचाचालक अपघातानंतर फरारी झाला आहे. यवत पोलीस व महामार्ग पोलीस चौफुला यांनी घटनास्थळी भेट दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!