नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभरातील अनेक तरुण बेरोजगार असून या तरुणांना रोजगाराची एक मोठी संधी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या अंतर्गत येणार्या एक महत्वाच्या मानल्या जाणार्या अणुऊर्जा विभाग येथे ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. थेट तुम्हाला अणुऊर्जा विभागात नोकरी करण्याची संधी आहे. अणुऊर्जा विभागात मेगा भरती सुरू आहे. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा.
या भरती प्रक्रियेतून मुंबई येथे खरेदी आणि भांडार संचालनालयासाठी पदे भरली जाणार आहेत. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत आहे. इच्छुकांनी वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावेत. ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. नुकताच याबाबतची अधिसूचना ही अणुऊर्जा विभागाने प्रसिद्ध केली आहे.
या भरती प्रक्रियेतून तब्बल 62 रिक्त पदे ही भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेत अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शिक्षणाची अट ही ठेवण्यात आलीये. उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठातून विज्ञान किंवा वाणिज्य शाखेतून पदवी घेतलेली असावी. हेच नाही तर या पदवीमध्ये त्याला 60 टक्के तरी असावेत. तरच तो उमेदवार यासाठी अर्ज करू शकतो.
या भरती प्रकियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 डिसेंबर 2023 आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना आपले अर्ज हे दाखल करावे लागतील. त्यानंतर आलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट लागू करण्यात आलीये. उमेदवाराचे वय हे 18 पेक्षा जास्त आणि 27 पर्यंत असावे. अणुऊर्जा विभागात सुरू असलेल्या या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. कनिष्ठ खरेदी सहाय्यक या पदांसाठी ही भरती प्रक्रिया घेतली जात आहे. विशेष म्हणजे आपण कुठेही बसून या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता. मग उशीर न करता या भरतीसाठी लगेचच अर्ज करा. परत एका लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 डिसेंबर 2023 आहे.