---Advertisement---

अक्कलकोट तालुक्यात मंगळवारी नऊ रुग्ण आढळले

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट, दि.२२ : अक्कलकोट शहर आणि तालुक्यात मंगळवारी ९ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.हे रुग्ण रॅपिड अँटीजन टेस्टमधून आढळल्याची माहिती तालुका नियंत्रण कक्षाने दिली आहे.

यामुळे तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या ९७९ झाली आहे. यात गोगाव १, केगाव १, अक्कलकोट शहरातील भीम नगरमध्ये ६ आणि तलाठ्याशी संबंधित एक (मांजरी) असे पद्धतीने ९ रुग्ण हे पॉझिटिव आढळले आहेत.आज १८८ टेस्ट करण्यात आल्या त्यापैकी ९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती नियंत्रण कक्ष दिली आहे. आतापर्यंत अक्कलकोट शहर आणि तालुक्यात ५५ जणांचा मृत्यू झाला असून ८० टक्के रुग्ण

हे बरे झाले आहेत.उर्वरित रुग्णावर अक्कलकोट आणि सोलापूर येथे उपचार सुरू आहेत. कोरोनासदृश्य लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकीय यंत्रणेशी संपर्क साधावा,असे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!