ध्यास विश्वसार्ह बातमीचा

देशभरातील ९५ टक्के लोकांकडे विमा नाहीच !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

सरकार आणि विमा नियामकाच्या प्रयत्नानंतरही देशातील सुमारे ९५ टक्के लोकांनी विमा घेतलेला नाही, असे नॅशनल इन्शुरन्स अकादमीने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष देबाशीष पांडा यांनी हा अहवाल प्रसिद्ध केला.

अति जोखीम असलेल्या भागात अनिवार्य नैसर्गिक आपत्ती विमा आवश्यक आहे आणि अहवालात याची शिफारसही करण्यात आली आहे. सर्वांसाठी विम्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हे आवश्यक आहे, असे पाणंद म्हणाले अहवालानुसार, देशातील १४४ कोटी लोकसंख्येपैकी ९५ टक्के लोक विम्याचे कव्हर करत नाहीत. देशातील नैसर्गिक आपत्ती आणि हवामानाशी संबंधित इतर आपत्तींच्या संख्येत झालेली वाढ लक्षात घेता विमा प्रवेश वाढवणे महत्त्वाचे आहे.

अहवालात असे म्हटले आहे की, कमी आणि मध्यम उत्पन्न गटातील ८४ टक्के लोक आणि किनारपट्टी भागात, द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील ७७ टक्के लोकांकडे विम्याची कमतरता आहे. जवळपास ७३ टक्के लोकसंख्येला आरोग्य विम्याचे संरक्षण मिळालेले नाही आणि या दिशेने सरकार, स्वयंसेवी संस्था आणि उद्योग समूह यांच्यात सहकार्य वाढवण्याची गरज असल्याचे अहवालामध्ये म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!