ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मोठी बातमी : देशातील ४९ खासदारांचे निलंबन !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

“सभागृहात संसद सुरक्षा भंग मुद्द्यांवरून विरोधी पक्षातील खासदारांनी आक्रमक होत गृहमंत्र्यांनी सभागृहात येऊन निवेदन करावं अशी मागणी केली होती. परिस्थिती लक्षात घेऊन गृहमंत्र्यांनी मागणी मान्य करणे गरजेचे होते. मात्र तसे न करता एवढ्या मोठ्या संख्येने सदस्यांना सदनाबाहेर काढण्यात आलं” आहे. यात खासदार सुप्रिया सुळे यांना लोकसभेतून निलंबित करण्यात आलं आहे. राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांचंही निलंबन करण्यात आलं आहे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल यांनाही निलंबित करण्यात आलं आहे. राष्ट्रवादीच्या या तीन खासदारांसह माला रॉय, मनीष तिवारी, चंद्रेश्वर प्रसाद, डिंपल यादव, कार्ति चिदंबरम, एसटी हसन यांनाही निलंबित करण्यात आलं आहे.

निलंबित करण्याचं कारण काय?
13 डिसेंबरला चार जणांनी संसद परिसरात जात धुमाकूळ घातला. यातील दोन तरूणांनी लोकसभेत जात प्रेक्षक गॅलरीतून थेट खासदार बसतात. त्या बाकांवर उडी मारली. या दोघांनी लोकसभेत धुडगूस घातला. या तरूणांच्या बुटांमधून पिवळ्या रंगाचा धूर निघाला. यानंतर संसदेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. या प्रकरणी चौकशी केली जावी आणि सरकारच्या बाजूने ऑफिशिअल स्टेटमेंट समोर यावं, यासाठी संसदेत विरोधक आवाज उठवत आहेत. याच कारणामुळे मागच्या दोन दिवसांपासून विरोधी पक्षातील खासदारांना निलंबित केलं जात आहे.

आज निलंबित करण्यात आलेल्या खासदारांची नावं
1. व्ही. वैथिलिंगम
2. गुरजीत सिंग औंजला
3. सुप्रोया सुले
4. एसएस.पलानिमनिकम
5. अदूर प्रकाश
6. अब्दुल समद
7. मनीष तिवारी
8. प्रद्युत बोर्डोलोई
9. गिरधारी यादव
10. गीता कोरा
11. फ्रान्सिस्को सारादिना
12. एस. जगतरक्षक
13. एस.आर. पार्थिवन
14. फारुख अब्दुल्ला
15. ज्योत्सना महंत
16. A. गणेशमूर्ती
17. माला रॉय
18. पी. वेलुसामी
19. ए.चेल्लाकुमार
20. शशी थरूर
21. कार्ती चिदंबरम
22. सुदीप बंदोपाध्याय
23. डिंपल यादव
24. हसनानीन मसूदी
25. डॅनिश अली
26. खलीलुर रहमान
27. राजीव रंजन सिंह
28. DNV. सेंथिल कुमार
29. संतोष कुमार
30. दुलाल चंद्र गोस्वामी
31. रवनीत सिंग बिट्टू
32. दिनेश यादव
33. के सुधाकरन
34. मोहम्मद सादिक
35. एमके. विष्णुप्रसाद
36. पीपी मोहम्मद फैजल
37. सजदा अहमद
38. जसवीर सिंग गिल
39. महाबली सिंग
40. अमोल कोल्हे
41. सुशील कुमार रिंकू
42. सुनील कुमार सिंग
43. एसडी हसन
44. एम. दनुषकुमार
45. प्रतिभा सिंह
46. थोल थिरुमलवन
47. चंद्रेश्वर प्रसाद
48. आलोक कुमार सुमन
49. दिलीश्‍वर कामैत

संसदेच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षातील खासदार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. याचवेळी खासदारांना निलंबित करण्यात आलं. यानंतर विरोधकांनी लोकसभेत गदारोळ घातला. यानंतर आता लोकसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!