ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पोलीस बनायला गेला अन झाला आरोपी !

सोलापूर : प्रतिनिधी

शासकीय नोकरी चुकीच्या पद्धतीने मिळवण्यासाठी गुन्हा करणाऱ्या भावी पोलीस उमेदवारांना पोलीस बनण्याऐवजी आरोपी बनण्याचे नशिबी आले.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर पोलीस मुख्यालयात ग्रामीण भरती प्रक्रियेमध्ये तीन आरोपींनी मैदानी चाचणी परीक्षेत आपापल्या चेस्ट क्रमांकाची अदलाबदल करून मैदानी चाचणी परीक्षा दिली. गुणतक्त्यावर बदललेल्या चेस्ट नंबरच्या उमेदवारांची बनावट सही करून भीमाशंकर नारायण पवार, सोमनाथ हरिदास पवार, नागेश गोविंद वाघमारे यांनी शासनाची फसवणूक करून चुकीच्या पद्धतीने नोकरी मिळवण्याचा गुन्हा केला. न्यायालयाने या तिघांना तीन वर्षांची शिक्षा सुनावली. जेल रोड पोलीस ठाण्यात या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. जेल रोड पोलिसांनी तिघा आरोपींविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

या खटल्याची सुनावणी न्यायदंडाधिकारी डी. डी. कोळपकर यांच्यासमोर झाली. आरोपींचे गुन्हे सिद्ध करण्यासाठी सरकार पक्षातर्फे साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये फिर्यादी सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड, इतर साक्षीदार तसेच घटनेचे तपासणी अंमलदार शिंदे यांची साक्ष या प्रकरणात महत्त्वाची ठरली. सरकार पक्षाच्या वतीने विशेष सहायक सरकारी अभियोक्ता ए. पी. काळे, विशेष सहायक सरकारी अभियोक्ता ए. आय. कोकणे यांनी काम पाहिले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!