---Advertisement---

सोलापूर विद्यापीठासमोर भीषण अपघात : अकरावीच्या विद्यार्थिनीचा दुर्देवी मृत्यू !

By team
On: December 24, 2023 10:02 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर सोलापूर विद्यापीठासमोर दि.२३ रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास भरधाव कारने रिक्षाला मागून धडक दिल्याने एका विद्यार्थिनीचा मृत्यू, तर दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. यात भाग्यश्री निवृत्ती कांबळे (वय १७) ही अकरावीतील विद्यार्थिनी अपघातात ठार झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोंडी येथून सोलापूर शहरात कॉलेजसाठी निघालेल्या रिक्षा (क्र. एमएच १३, सीटी ९४७९) ला सोलापूर विद्यापीठासमोर पुण्याकडून सोलापूरकडे येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, रिक्षात बसलेली भाग्यश्री कांबळे ही विद्यार्थिनी रिक्षातून फेकली गेली. मुख्य रस्त्यावर असलेल्या रिक्षातून फेकली गेलेली भाग्यश्री सर्विस रस्त्यावर आपटली. या मुळे तिला गंभीर दुखापत झाली. त्याचबरोबर रिक्षात तिच्यासोबत असलेली तिची मैत्रीण ऐश्वर्या जगन्नाथ सोडगी (वय १९) ही या अपघातात गंभीर जखमी झाली आहे. तिच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याचबरोबर या अपघातात रिक्षात असलेला आदित्य सुनील भोसले (वय १४) हा आठवीत शिकणारा विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी सोलापूर शहरातील अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर ऐश्वर्या सोडगी हिच्यावर अश्विनी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच कोंडी येथील तरुणांनी जखमींना सोलापूर शहरातील रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच भाग्यश्रीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!