---Advertisement---

अन्नछत्र मंडळात दत्त जयंती निमित्त भक्तीचा माहोल;हजारो भक्तांनी घेतला महाप्रसाद

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त, सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय…! च्या जयघोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात श्रीदत्त जयंती उत्सव सोहळा मंगळवारी सायंकाळी न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वखाली हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

श्री दत्तमंदिर नव्याने साकारण्यात आलेले असून या मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांनी सजविण्यात आलेले आहे. चांदीच्या पाळण्याला ही गुलाबाच्या फुलाने सुशोभित करण्यात आले होते.

दरम्यान न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पु पुजारी यांच्या हस्ते धार्मिक विधी करण्यात आला. सत्संग महिला भजनी मंडळासह विविध भजन मंडळांनी भजन सेवा रुजू केले. सायं. ६ वा. श्री दत्तजन्म व गुलाल, पाळणा हा कार्यक्रम न्यासाची सहयोगी संस्था असलेल्या हिरकणी महिला मंडळाच्या पदाधिकारी व सदस्य यांच्यासह स्वामी भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला. मंत्र पठण न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी यांनी केले.

संकल्प व नैवेद्य आरती न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले व अर्पिताराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. भजनी मंडळाचा सत्कार न्यासाच्या वतीने करण्यात आला. याप्रसंगी सुंठवडा प्रसाद व मसाला दूध वाटप करण्यात आले.

यावेळी न्यासाची सहयोगी संस्था असलेल्या हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा अलकाताई भोसले, उपाध्यक्षा रत्नमाला मचाले, सचिवा अर्पिताराजे भोसले, कु.तेजस्वी भोसले, मल्लम्मा पसारे, डॉ.आसावरी पेडगावकर, विशाला अभय दिवाणजी, निंगुताई हिंडोळे, खजिनदार स्मिता कदम, संगीता भोसले, कोमल क्षीरसागर, शितल क्षिरसागर, कल्पना मोरे, विजया अंबुरे, निशा बाबर, रूपा पवार, उज्वला भोसले, सुवर्णा घाडगे, क्रांती वाकडे, स्वप्ना माने, स्वाती निकम, राजश्री माने, दिपाली हत्ते, यांच्यासह मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, कु.हर्षवर्धनराजे भोसले, अशोकराव जाधव, मनोज निकम, आप्पा हंचाटे, सागर हळगोदे, महेश शिर्के, अतिष पवार, निखिल पाटील, गोटू माने, प्रवीण घाटगे, नारशिंग क्षीरसागर, पप्पू कोल्हे, किरण साठे, रमेश केत, संदीप सुरवसे, शहाजीबापू यादव, प्रसाद हुल्ले, रमेश हेगडे, राजू पवार, सौरभ मोरे, बलभीम पवार, किरण साठे, गणेश पाटील, राजेंद्र काटकर, संतोष श्रीमान, सोमनाथ शिंदे, प्रसन्न हत्ते, बालाजी कटारे, भरत राजेंगावकर, वैभव मोरे, सुमित कल्याणी, बाळासाहेब घाडगे, राहुल इंडे, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, देवा हंजगे, संभाजीराव पवार यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अप्पू पुजारी यांनी केले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!