ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोटमध्ये श्री बिरेश्वर को-ऑप क्रेडिट सोसायटीचा शुभारंभ !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

कर्नाटकातील बॅकींग क्षेत्रातील नामांकित श्री बिरेश्वर को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.एक्संबाचे (मल्टीस्टेट) २०६ व्या अक्कलकोट नुतन शाखेचा उदघाटन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत गुरुवारी पार पडला.फत्तेसिंह चौक येथे सुरू करण्यात आलेल्या शाखेचा भविष्यात नक्की विस्तार होईल,असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.

या सोहळ्याला अक्कलकोट विरक्त मठाचे म.नि.प्र.बसवलिंग महास्वामीजी यांच्यासह काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे,वटवृक्ष देवस्थानचे महेश इंगळे,अन्नछत्र मंडळाचे अमोलराजे भोसले, युवा नेते शिवराज म्हेत्रे,दुधनी बाजार समितीचे माजी सभापती प्रथमेश म्हेत्रे,माजी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी,रासपचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील बंडगर,रिपाइंचे अविनाश मडीखांबे,माजी नगरसेवक सद्दाम शेरीकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

सध्या बहुराज्य कायद्याअंतर्गत संस्थेच्या कर्नाटक,महाराष्ट्र आणि गोवा राज्यात १९५ शाखा कार्यरत आहेत.कर्नाटक आणि महाराष्ट्रात एकाच दिवशी अकरा शाखांना प्रारंभ झाला आहे.यात अक्कलकोटचाही समावेश आहे.३ लाख ६४ हजारांपेक्षा अधिक सभासदासह ३ हजार ४३८ कोटी पेक्षा अधिक ठेव या को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये आहे.अक्कलकोटमध्ये देखील ही संस्था बँकिंग क्षेत्रात नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वास बसवलिंग महास्वामी यांनी व्यक्त केला.

यामध्ये वेस्टर्न युनियन,रियामणी,मनीग्राम, म्युच्युअल फंड, जनरल इन्शुरन्स,शेअर ट्रेडिंग,पॅन कार्ड,विदेशी चलन विनिमय या व्यतिरिक्त विमान,रेल्वे,केएसआरटीसी आणि खाजगी बस टिकीट बुकिंग,मोबाईल रिचार्ज यासारख्या सुविधा या मार्फत पुरविण्यात येणार आहेत.संस्थेचे संस्थापक चिकोडीचे खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या नेतृत्वाखाली आणि निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली ही बँक प्रगतीपथावर आहे.जोल्ले ग्रुप आज अनेक क्षेत्रात म्हणजे आर्थिक,शैक्षणिक,सामाजिक, कृषी,औद्योगिक , महिला सबलीकरण, युवा सबलीकरण, कला, साहित्य, क्रीडा विविध क्षेत्रात जनसामान्यांची सेवा करत आहे.ग्रामीण प्रदेशातून सुरू झालेला प्रवास संपूर्ण देशातील विविध राज्यांमध्ये पंख पसरून यशस्वीरित्या कार्यरत आहे.सहकार क्षेत्राबरोबरच कॉर्पोरेट जगात सुद्धा यशस्वीरित्या पाऊल टाकले, असे उपप्रधान व्यवस्थापक महादेव मंगावते यांनी सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याणी करडे यांनी केले.आभार शाखा व्यवस्थापक विलास चौगुले यांनी मानले.कार्यक्रमास चिदानंद बिराजदार,शरणगौडा पाटील,प्रवीण शटगार,काशिनाथ कुंभार, बाबासाहेब पाटील,इरणा धसाडे,काशिनाथ गोळळे,सौरभ शहा,सागर शिंदे,गिरीश गुब्रे, रविराज पाटील,मल्लिकार्जुन मेंथे,राम मातोळे, सुरेश जवळे, सुनील इसापुरे यांच्यासह बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!