सोलापूरच्या दिव्यांग गायकाचे सिनेसृष्टीतील दिग्गजांकडून कौतुक
काटेर चित्रपटाच्या प्रि रिलीज इव्हेंट व्यासपीठावर रेवणसिद्धचे गायन
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
तोळणूर येथील दिव्यांग गायक रेवणसिद्ध फुलारी यांचे कर्नाटक राज्यातील मंड्या जिल्ह्यात बॉईज कॉलेज मैदानावर पार पडलेल्या चॅलेंजिंग स्टार डी बॉस दर्शन अभिनय कार्यक्रमात बहुचर्चित काटेर चित्रपटाच्या प्रिरीलिज इव्हेंट व्यासपीठावर गायन करून उपस्थितांची मने जिंकली.यावेळी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी कौतुक करत त्यांना पुढील संगीत क्षेत्रातील गायन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
रेवणसिद्ध हा तोळणूर सारख्या एका छोट्याशा गावातून संगीत क्षेत्रात कोणताही अनुभव नसताना पुढे येत आहे.दिव्यांग असूनही फक्त आणि फक्त जिद्दीच्या आणि प्रयत्नांच्या जोरावर कमी कालावधीत सिनेक्षेत्रात मोठी उडी मारून चित्रपटाच्या प्रिरिलिज इव्हेंटमध्ये मोठ्या व्यासपीठावर देशातील दिग्गज कलाकार आणि संगीत क्षेत्रातील सुप्रसिद्ध गायिका स्टार सिंगर मंगली यांच्यासोबत गायन करून वाहवा मिळवली.विशेष म्हणजे स्टार सिंगर मंगली यांनी रेवणसिद्धच्या गायनाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.यावेळी डी बॉस दर्शन यांनी स्वतः अभिनय केलेल्या नम्म प्रितिय रामू चित्रपटातील नन्नेदे बानली रेक्केया तेरेयो बण्णदा हक्किगळे या गाण्यावर मंत्रमुग्ध होवून भावूक झाले होते.गाणे संपल्यावर स्वतः दर्शन यांनी रेवणसिद्धची पाठ थोपटून अभिनंदन करून सिने क्षेत्रातील सर्व नव्या अभिनेते,कलाकारांचा परिचय करून देत स्वागत केले.कन्नड सिनेसृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री मालाश्री,श्रुती, सुमलता,रोकलाईन व्यंकटेश,आराधना, मेघना शेट्टी, बृंदा आचार्य,धनाविर, यश सूर्य, अभिषेक अंबरीश, चिक्कण्णा ,कुमार चंद्रू,वी. हरिकृष्णा,पूनित आर्या,महेश मदगज, मास्टर रोहित आदींसमवेत सिनेसृष्टीतील कलाकारांनी आणि उपस्थित डी बॉस दर्शन यांच्या चाहत्यांनी फुलारी यांच्या गायनाचे कौतुक केले.