ध्यास विश्वसार्ह बातमीचा

निवडणुकीसाठी महायुती मैदानात : राज्यभरात होणार कार्यकर्ते मेळावे !

मुंबई : वृत्तसंस्था

देशात यंदाच्या वर्षी लोकसभासह विधान सभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. त्यापूर्वी सर्वच पक्षांनी राजकारण तापविले आहे. यासंदर्भात तिनही पक्षाच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आगामी काळातील महायुतीच्या कार्यक्रमाविषयी माहिती दिली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री दादा भुसे व अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी महायुतीच्या कार्यक्रमाची माहिती दिली.

आगामी लोकसभा निवडणुकीला एकत्र सामोरं जाण्याचा आमचा निर्धार आहे. त्या अनुषंगाने आम्ही कामाला लागलो आहोत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुन्हा तिसऱ्यांदा केंद्रात सरकार स्थापन होणार आहे. हा विश्वास आम्हाला आहे. असे सुनील तटकरे म्हणाले. तर येणाऱ्या 14 जानेवारी पासून राज्यभरात आमचे एकत्र कार्यकर्ता मेळावे पार पडतील, त्यासाठी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे मेळाव्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात चांगले यश मिळेल, असा विश्वास आम्हाला आहे. 45 पेक्षा अधिक जागांवर महायुतीचा विजय होईल, असा आमचा निर्धार आहे. त्या अनुषंगाने आगामी काळात महायुतीतीत सर्व घटकपक्षांचे संयुक्त मेळावे पार पडणार आहेत. बावनकुळे म्हणाले की, तीन्ही पक्ष जेव्हा एकत्र आले. तेव्हापासून उर्वरित पक्षातून येणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या अतिशय झपाट्याने वाढ आहे. याचे एकमेव कारण म्हणजे मोदींजींवर असलेला लोकांचा विश्वास. राज्यातील सरकारवर असलेला विश्वास. तर पुढील काही काळात विरोधकांकडे फक्त नेते उरतील पण कार्यकर्ते दिसणारच नाही, असा टोला त्यांनी लगावला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!