व्हा.चेअरमन शिंदेचा वाढदिवस ६ हजार कामगारांना दिली मायेची ऊब !
गोकुळ परिवाराने ब्लँकेट वाटप करून साजरा केला वाढदिवस
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
गोकुळ शुगरचे व्हाईस चेअरमन विशाल शिंदे यांचा वाढदिवस ६ हजार ऊसतोड कामगारांना ब्लॅंकेटचे वाटप करून अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. दरवर्षी वाढदिवसाच्या निमित्ताने काही ना काही उपक्रम घेऊन गोकुळ परिवाराने सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.प्रतिनिधीक स्वरूपात बावकरवाडी ( ता.अक्कलकोट ) येथे उसाच्या फडात जाऊन ऊसतोड मजुरांना चेअरमन दत्ता शिंदे व व्हाईस चेअरमन विशाल शिंदे यांच्या हस्ते त्याचे वाटप करण्यात आले. सध्या थंडी मोठ्या प्रमाणात आहे त्यापासून ऊसतोड कामगारांना दिलासा मिळावा यासाठी ठिक – ठिकाणी ऊस तोड करत असलेल्या ६ हजार ऊस तोड कामगारांना ब्लॅंकेटचे वाटप करून त्यांना मोठा दिलासा दिला आहे.
कारखान्याच्या शेती विभागातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.बावकरवाडी येथे झालेल्या कार्यक्रमात बोलताना चेअरमन दत्ता शिंदे म्हणाले,कारखान्याने आतापर्यंत साडे तीन लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले आहे शेतकऱ्यांचा ऊस अजूनही मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे.त्यामुळे यावर्षी ७ लाख मेट्रिक टना पेक्षा अधिक ऊस गाळप हा कारखाना करेल.सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांची सर्व बिले आम्ही वेळेत दिल्यामुळे शेतकऱ्यांचा कारखान्याला चांगला प्रतिसाद आहे.
या विश्वासाला आम्ही पुढच्या काळातील पात्र राहू असे ते म्हणाले.व्हाईस चेअरमन विशाल शिंदे यांनी उपस्थित मान्यवरांचे शुभेच्छांबद्दल आभार मानले.यानंतर कारखाना कार्यस्थळावर देखील वाढदिवसानिमित्त सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी शेती, अकाउंट,परचेस , प्रोसेस, इंजिनिअरिंग, सुरक्षा ,सिव्हिल,स्टोअर विभागातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी मोट्याळचे सरपंच कार्तिक पाटील, कुरनूरचे सरपंच व्यंकट मोरे,अभिजीत गुंड, राजू चव्हाण,फक्रुद्दीन जहागीरदार, मुख्य शेती अधिकारी बालाजी पाटील,संपत अटकळे,कारखान्याचे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर प्रदीप पवार, वर्क्स मॅनेजर राजकुमार लवटे,प्रोसेस मॅनेजर भावसार,चीफ अकाउंटंट उमेश पवार ,परचेस मॅनेजर अरविंद जंगाले,सिव्हिल इंजिनिअर अनिल अगरखेड इलेक्ट्रिकल इंजिनियर किरण तोगरळकर, कारखान्याचे शेती विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. बावकरवाडी येथे झालेल्या कार्यक्रमाला अण्णासाहेब पाटील ,सुभाष राठोड ज्ञानेश्वर जाधव ,सुदाम कदम ,विनायक पवार सैपन टक्के ,समर्थ माळगे ,अर्जुन भरमशेट्टी, युवराज बाणेगाव ,श्रीशैल बावकर ,भीमाशंकर दुलंगे ,स्वामीनाथ टाके,राजेंद्र पाटील ,खंडेराव भोसले ,दत्तात्रय साखरे ,सिद्धाराम वरमठ ,सायबणप्पा म्हमाणे, स्वामीराव जाधव, भगवान जाधव, प्रकाश जाधव,हनुमंत बावकर, सुरेश इंगोले आदींसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.