ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मनोज पाटलांची अजित पवारांवर टीका : आरक्षणावर बोलू नका !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी २० जानेवारीला मुंबईत येणारच अशी भूमिका घेतलेली आहे. जरांगे पाटील यांच्या या निर्णयावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केली होती. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न कुणी केला, तर त्याचा मुलाहिजा ठेवायचा नाही. कायद्यापेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही, असा टोला अजित पवार यांनी लगावला होता. त्यांच्या या टीकेला आता मनोज जरांगे पाटील यांनी उत्तर दिले आहे.

“अजित पवार यापुढे मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलले तर त्यांचा वेगळा विषय हाती घ्यावा लागेल. तुम्ही तुमच्या ज्ञानाचा ग्रंथ लिहा, पण मराठा आरक्षणाबाबत बोलायचं नाही,” असा इशारा जरांगे पाटलांनी अजित पवारांना दिला आहे. आज अंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हा इशारा दिला आहे.

तसेच “पहिल्यापेक्षा या दौऱ्यात लोकांचा पाठिंबा वाढला आहे. जास्त दिवस झाल्यानंतर आंदोलनाची धार कमी होते, पण या दौऱ्यात लोकांचा पाठिंबा वाढलेला दिसून आला. असेही जरांगे पाटील म्हणालेत. मोर्चात आमच्या वाढलेल्या संख्येमुळे सर्वांना आरक्षण मिळणार आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!