ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राम मंदिर प्रतिष्ठापणेचं निमंत्रण सचिन तेंडुलकरलाही !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

सध्या अयोध्येत राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापणेची धामधून देशभर सुरु असून राम ललाच्या आगमनाची जय्यत तयारी देखील सुरु आहे. भगवान श्रीरामाच्या जन्मस्थानी भव्य मंदिर उभारल्यामुळे देशात एक वेगळेचं उत्सवाचं वातावरण आहे. राम मंदिरात अभिषेक होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले असून संपूर्ण देश या भव्य सोहळ्याचा साक्षीदार होणार आहे. दरम्यान भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरलाही राम मंदिर प्रतिष्ठापणेचं निमंत्रण पाठवण्यात आलं आहे.

२२ जानेवारीला देशात होणाऱ्या सर्वात मोठ्या धार्मिक कार्यक्रमात सामील होणाऱ्या मान्यवरांमध्ये आता सचिन तेंडुलकरचंही नाव सामिल झालं आहे. त्यामुळे राम मंदिर प्रतिष्ठापणेला सचिन तेंडुलकरही जाणार आहे. एएनआयने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. मास्टर ब्लास्टरची श्रद्धा सर्वांनाच माहिती आहे. दरवर्षी तो घरी गणपतीची मूर्ती बसवतो आणि कुटुंबासोबत पूर्ण भक्तिभावाने साजरा करतो.

अयोध्येत आयोजित करण्यात आलेल्या राम मंदिर प्रतिष्ठापणेच्या विषेश कार्यक्रमासाठी सुमारे 8000 मान्यवरांना आमंत्रित करण्यात आलं आहे. रामललाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापणा सोहळ्यात विशेष व्यक्ती सहभागी होणार आहेत. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रमुख (आरएसएस) मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनाही निमंत्रित करण्यात आलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!