---Advertisement---

उद्धव ठाकरेंचा शिंदे पिता- पुत्रांवर हल्लाबोल

By team
On: January 13, 2024 6:36 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात आमदार अपात्र प्रकरणी निकाल शिंदे गटाकडून लागले आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण- डोंबिवली मतदार संघाचा आज उद्धव ठाकरेंनी दौरा केला. यावेळी उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवसेनेच्या शाखांचे उद्घाटन झाले. यावेळी शिवसैनिकांशी संवाद साधताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासह उद्धव ठाकरे यांनीही शिंदे पिता- पुत्रांवर हल्लाबोल केला.

“सर्व देशभक्त एकत्र झालेत सर्व पक्ष आज एकत्र आलेत. आपलं हिंदुत्व बेंगडी नाही आपण हिंदुत्व सोडू शकत नाही. राम मंदिर विषय थंड बसला होता. मी राम मंदिरात गेल्यानंतर मंदिराचा निकाल लागला, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. देशाच्या धार्मिक सोहळा आहे तेव्हा राष्ट्रपतींना बोलवायला हवं, मात्र हे शंकराचाऱ्यांनाही ही बोलवत नाहीत..” अशी टीकाही ठाकरेंनी यावेळी केली. “तुम्ही माझं चोरलेलं धनुष्य बाण घेऊन उभे राहा आम्ही मशाल घेतो होऊन जाऊदे, असे आव्हानही ठाकरेंनी यावेळी दिले. तसेच कल्याण-डोबिंवली लोकसभा मतदारसंघ हा भगव्याचा बालेकिल्ला राहिला आहे. भगव्याशी गद्दारी करणाऱ्यांना गाडणारा हा मतदारसंघ आहे,” असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!