ध्यास विश्वसार्ह बातमीचा

याची देही याची डोळा पाहिला अनुपम ‘अक्षता सोहळा’!

ग्रामदैवत सिध्दरामेश्वर महाराज यात्रेतील अक्षता सोहळा भक्तिभावाने :

सोलापूर : प्रतिनिधी

एकदा भक्तलिंग हर्रऽऽ बोला हर्रऽऽ, शिवयोगी श्री सिद्धेश्‍वर महाराज की जयऽऽ चा जयघोष… दुपारी 1.46 वाजता सत्यम सत्यम… दिड्डम… दिड्डम…चा उच्चार झाला अन्‌ चारही बाजूंनी अक्षतांचा वर्षाव झाला…! ग्रामदैवत श्री सिद्धेश्‍वर महाराजांच्या योगदंडाचा कुंभारकन्येशी विवाह सोहळा रविवारी भक्तिभावाने पार पडला. रंगीबेरंगी फुलांनी मांडवासारखा सजलेला संमती कट्टा येथे भक्तिमय वातावरणात उत्साहाने जमलेल्या लाखो भाविकांनी //’याची देही याची डोळा’ हा सोहळा पाहिला. पांढ//ऱ्या शुभ्र बाराबंदीमुळे जणू धवल सागराला भरती आल्याचे मनोहारी चित्र पाहायला मिळाले. सुमारे 900 वर्षांची परंपरा असलेल्या ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यात्रेच्या दुस//ऱ्या दिवशी रविवारी श्री सिद्धरामेश्वर मंदिर परिसरातील संमती कट्ट्यावर योगदंडाबरोबर अक्षता सोहळा संपन्न झाला. भक्तिमय वातावरणात झालेल्या या सोहळ्यास भाविकांचा जनसागर उसळला होता.

सकाळी श्री मल्लिकार्जुन मंदिराजवळ हिरेहब्बू वाड्यात मानकरी राजशेखर हिरेहब्बू व देशमुख यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. त्यानंतर योगदंड व पालखी श्री सिद्धरामेश्वर मंदिराकडे मार्गस्थ झाली. परंपरेनुसार जागोजागी भाविकांनी नंदीध्वजांची पारंपरिक पध्दतीने पूजा केली. हिरेहब्बू यांच्या घरापासून निघालेली पालखी पुढे दाते गणपती दत्त चौक, सोन्या मारुती, माणिक चौक, विजापूर वेस, पंचकट्टा, सिद्धेश्वर प्रशालामार्गे संमती कट्ट्यावर पालखी व योगदंड पोहोचले.

नंदीध्वजांच्या मार्गाकडे डोळे लावून बसलेल्या भाविकांचे चेहरे दुपारी 12.35 वा. च्या सुमारास आनंदाने खुलले. पंचरंगी ध्वजासह सातही मानाच्या नंदीध्वजांचे आगमन झाल्यानंतर डोळे मिटून हात जोडून सर्वांनी नमन केले. पारंपरिक वाद्यांसह ढोलच्या दणदणाटाने वातावरणात अधिकच उत्साह संचारला होता. पांढ//ऱ्या शुभ्र बाराबंदीतल्या भाविकांची लाट संमती कट्ट्याच्या दिशेने येत होती. डौलाने संमती कट्ट्याकडे येणा//ऱ्या नंदीध्वजांना स्मार्ट फोनमधील कॅमे//ऱ्यात कैद करण्यासाठी भाविकांची धडपड सुरू होती. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून पोलिसांनी मुख्य मार्ग बंद केला होता. आबालवृद्धांच्या मुखातील एकदा भक्तलिंग हर्रऽऽ बोला हर्रऽऽ, शिवयोगी श्री सिद्धेश्‍वर महाराज की जयऽऽ च्या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला होता. //’ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय’चा जप करण्यात आला.

नंदीध्वजांच्या आगमनानंतर हिरेहब्बू श्री सिद्धेश्‍वर महाराजांच्या पूजेसाठी मंदिरात गेले. सकाळपासूनच वेदमूर्ती बसवराज शास्त्रींनी कन्नड, मराठी, हिंदी आणि इंग्लिश भाषेतून खुमासदार शैलीत निवेदन करून सर्वांनाच खिळवून ठेवले होते. तोवर संमती कट्ट्यावर विवाह सोहळ्याची तयारी पूर्ण झाली होती. संमती कट्ट्याजवळ गंगा पूजन व सुगडी पूजन झाले. मानकरी कुंभार यांच्याकडून दिलेल्या सुगडीचे हिरेहब्बू व देशमुख यांच्या हस्ते पूजन केले. यावेळी मानकरी म्हेत्रे – कुंभार उपस्थित होते.

यात्रिक निवास येथे संमती पूजन झाले. सुहास शेटे यांना राजशेखर देशमुख यांनी संमती पाने दिली. देशमुख यांनी हिरेहब्बू यांना दिली. संमती कट्ट्यावर गेल्यावर सिध्देश्वर देवस्थान समितीच्यावतीने हिरेहब्बू, देशमुख व इतर मान्यवरांना पुष्पहार घालून स्वागत केले. सुहास शेटे यांनी संमती वाचन सुरू केले. दुपारी एक वाजून 46 वाजता सत्यम सत्यम… दिड्डम… दिड्डम….! म्हणताच भाविकांनी चारही दिशातून अक्षतांचा वर्षाव केला आणि अखेर सोलापुरात ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराज यात्रेतील पारंपरिक अक्षता सोहळा भक्तिभावात पार पडला. श्री सिद्धरामेश्वर यांच्या योगदंडाशी कुंभार कन्येचा विवाह सोहळा झाला.

या मान्यवरांची होती उपस्थिती
अक्षता सोहळ्याला काशीपीठाचे जगद्//गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य महास्वामी, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, ज्येष्ठ नेत्या उज्ज्वला शिंदे, सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, सुभाष देशमुख, मानकरी विजयकुमार देशमुख, प्रणिती शिंदे, सचिन कल्याणशेट्टी, रोहित पवार, हे आमदार, माजी आमदार दिलीप माने, अक्कलकोटचे मालोजीराजे भोसले, विश्वनाथ चाकोते, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, जिल्हा परिषदेच्या सीईओ मनीषा आव्हाळे, महापालिकेचे आयुक्त शीतल तेली – उगले, अतिरिक्त आयुक्त संदिप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, सिद्धेश्वर कारखान्याचे चेअरमन पुष्पराज काडादी, विश्‍वस्त //ॲड. मिलिंद थोबडे, राजशेखर शिवदारे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे, प्रा. शिवाजी सावंत, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी महापौर महेश कोठे, माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी, सुरेश हसापुरे, मनीष देशमुख यांच्यासह राजकीय नेत्यांची उपस्थिती होती.

‘संस्कारभारती’ची तीन किलोमीटर आकर्षक रंगावली
अक्षता सोहळ्याच्या दिवशी नंदीध्वजांच्या मिरवणूक मार्गावर //’संस्कारभारती’चे संपूर्ण भारत देशातील ४५० ते ५०० रंगावली कलाकारांनी आपली कला सादर केली. रांगोळीच्या पायघड्या (पथरंगावली) घालण्यात आल्या होत्या. चंद्रयान विजयी भवची थीम घेण्यात आली होती. दत्त चौक येथे या रंगवलीचे उद्//घाटन खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. कसबा पेठेतील हिरेहब्बू मठापासून ते सिध्देश्वर मंदिरातील संमती कट्टापर्यंत तीन किलोमीटरच्या मार्गावर रंगावलीची सुरेख पायघडी अंथरण्यात आली. //’संस्कारभारती’चे कार्यकर्ते रघुराज देशपांडे, अनंत देशपांडे व देवेंद्र आयचित यांच्या मार्गदर्शनाखाली हे नेत्रमनोहर कार्य कौशल्याने साकारले असून रंगावलीमध्ये गोपद्म, केंद्रवर्धिनी, शृंखला, सर्परेषा आदी मंगलचिन्हे रेखली. गेल्या एकवीस वर्षांपासून //’संस्कारभारती’चे कार्यकर्ते अक्षता सोहळ्याच्या दिवशी नियमित रंगावली घालत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!