अटीतटीच्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर शेवटच्या ओव्हरमध्ये 13 धावांनी सनसनाटी विजय मिळवला आहे. भारताने या सामन्यात ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी ३०३ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना आरोन फिंच आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी अर्धशतके झळकावली, पण त्यांना संघाला विजय मिळवून देता आला नाही. भातीय संघाचा ऑस्ट्रेलियाच्या दौऱअयातील हा पहिला विजय आहे.
भारताने पहिल्यांदाच या मालिकेत नाणेफेक जिंकली आणि प्रथण फलंदाजी केली. भारताने प्रथण फलंदाजी करताना विराट कोहली, हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजा यांच्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियापुढे ३०३ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला 289 धावां ऑलआऊट केलं. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार अॅरॉन फिंचने सर्वाधिक 75 धावा केल्या. तर ग्लेन मॅक्सवेलने 59 धावांची खेळी केली. टीम इंडियाकडून शार्दूल ठाकूरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर पदार्पण केलेल्या थंगारासून नटराजन आणि जसप्रीत बुमराह या जोडीने प्रत्येकी 2 विकेट्स मिळवल्या. तर कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा या फिरकी जोडीने प्रत्येकी 1 फलंदाजाला माघारी पाठवलं.
हा पराभव झाला असला तरी ऑस्ट्रेलियाने याआधीचे 2 सामने जिंकले होते. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने 2-1 अशा फरकाने एकदिवसीय मालिका जिंकली आहे.











