ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कांद्याने शेतकऱ्यांना रडविले तर लसणाने घेतला भाव !

मुंबई : वृत्तसंस्था

देशभरात महागाई वाढत असतांना गेल्या काही महिन्यापासून कांद्या प्रश्न पेटला होता मात्र निर्यातबंदीनंतर कांद्याचे उतरणारे दर तीन महिन्यांपासून शेतकऱ्यांना रडकुंडीस आणत असताना लसणाचा भाव महागला आहे. कांद्याला दोन दिवसांपासून केवळ प्रतिक्विंटल केवळ ६०० ते २,२०० व सरासरी १,७०० चा भाव मिळत असताना लसूण प्रतिक्विंटल ६,३०० ते १७,६०० व सरासरी १३,५०० याप्रमाणे विक्री झाला.

भाव मिळत नसल्याने शेतकरी निर्यातबंदी हटेल या आशेने कांदा साठवणूक करीत आहेत. मात्र महिन्याच्या वर कालावधी लोटला तरी कांद्याच्या भावात वाढ न होता ते कमीच होत आहेत. बाजारात पांढरा लसूण ३२० ते ३५० तर गावठी लसूण ४०० ते ४५० रुपये असताना कांदा मंगळवारी २० रुपये किलोने विक्री झाला. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत खरीप पोळ कांद्याची आवक २१ हजार क्विंटल झाली. त्यास भावही कमी मिळाला.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणार्ची आवक फक्त्त १०० ते ११० विचेटल झाली. आवक प्रचंड घटल्याने लसणाने भावात आपला उच्चांक गाठला आहे. त्यामुळे लसूण फार महाग तर कांदा फारच स्वस्त अशी अवस्था किचनमध्ये झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!