---Advertisement---

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गोकुळ शुगरच्यावतीने स्वागत

Follow Us:
---Advertisement---

 

तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट, दि.१९ : कुंभारी (तालुका दक्षिण सोलापूर ) येथील रे नगर येथील गृहप्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते.यावेळी गोकुळ शुगरच्यावतीने चेअरमन दत्ता शिंदे
यांनी त्यांचे स्वागत केले.अगदी दोन मिनिटाच्या झालेल्या या भेटीमध्ये चेअरमन शिंदे यांनी ज्या भागात हा गृह प्रकल्प उभारला गेला आहे त्या भागातील कारखान्याचा मी एक
युवा चेअरमन आहे असे सांगताना मोदी यांनी चेअरमन शिंदे यांच्या पाठीवर थाप मारत आगे बढो अशी शाबासकी दिली.गेल्या अनेक दिवसांपासूनची इच्छा होती.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूर दौऱ्यावर आल्यामुळे ही संधी प्राप्त झाली. त्यांनी युवा उद्योजकांशी साधलेला संवाद आशादायी वाटतो.यासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे आभार असेही शिंदे यांनी सांगितले.यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य शहाजी पवार, इंद्रजीत पवार,मनीष देशमुख, उदय पाटील,कार्तिक पाटील, अभिजित गुंड आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!