मुंबई : वृत्तसंस्था
देशासह राज्यात देखील आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी सुरु केली आहे. यात कॉंग्रेस पक्ष देखील सज्ज झाला असून काँग्रेस कमिटीने राज्यातील सर्व विभागांमध्ये प्रभागनिहाय बैठकांचं आयोजन केलं आहे. १८ जानवारीपासुन या बैठका सुरू झाल्याची माहिती मिळतेय. आज कोकण विभागीय पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित केलेली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून भिवंडी भिवंडी लोकसभा मतदारसंघावर काँग्रेस उमेदवारांचं वर्चस्व आहे, असं असताना महाआघाडीच्या घटक पक्ष या पारंपरिक उमेदवारीला शह देण्याासाठी आता प्रयत्न करत आहेत. याची दाखल घेत भिवंडीच्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यानिमित्ताने रांजणोली येथे आज २४ जानेवारी रोजी काँग्रेसच्या कोकण विभागीय पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली जाणार आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात भाजपा विरोधी महाआघाडी स्थापन झाली. भिवंडी लोकसभेसाठी महाआघाडीच्या घटकपक्षांचे वेगवेगळे उमेदवार मतदारांसमोर आता जाऊ लागले आहेत. त्यामुळे मतदारांसमोर महाआघाडीबाबत संभ्रम निर्माण होतोय. भिवंडी लोकसभा हि काँग्रेसची पारंपरिक सीट आहे. पण महाआघाडी आता या जागेसाठी प्रयत्न करत आहे.
काँग्रेसने प्रदेश पदाधिकाऱ्यांपासून स्थानिक कार्यकर्त्यांपर्यंत लोकसभेसाठी आपला दावा कायम ठेवलाय. त्यासाठी काँग्रेसचे लोकसभा प्रभारी अनिस अहमद यांनी मोर्चेबांधणी देखील सुरु केलीय. भिवंडीसह लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसच्या बैठका सुरु आहेत. तेलंगणाच्या निवडणुकीत वापरलेला फॉर्मुला महाराष्ट्रात वापरण्यात येणार असल्याचं त्यांनी एका औपचारिक बैठकीत सांगितलं आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या मार्गदर्शनासाठी आयोजित केलेल्या आढावा बैठकीत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी तथा केरळचे गृहमंत्री रमेश चेनीथल्ला, विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार, प्रदेशाध्यक्ष नानापटोले, आमदार अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, सुशीलकुमार शिंदे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष दयानंद चोरघे यांनी दिलीय.