ध्यास विश्वसार्ह बातमीचा

उपमुख्यमंत्री पवारांच्या ताफ्याला दाखविली काळे झेंडे

पुणे : वृत्तसंस्था

राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील सरकार विरुद्ध लढा देत असतांना पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात दाैऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी आले असतांना या वेळी पुण्याचे पालकमंत्री असलेल्या पवार यांना जुन्नर, आळे फाटा परिसरात उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट आणि मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी अारक्षणाच्या मागणीवर अाक्रमक हाेत काळे झेंडे दाखवले.

यामुळे पवार यांचा ताफा रस्त्यावर थांबल्यानंतर पाेलिसांनी तत्काळ अांदाेलनकर्त्यांना ताब्यात घेऊन पाेलिस गाडीत घालून ठाण्यात नेले. शुक्रवारी दुपारी आळे फाटा येथे चिल्हेवाडी बंदिस्त नलिकेद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचा दुसऱ्या टप्प्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. दरम्यान, भूमिपूजन उरकून आळे फाटा येथील एका खासगी कार्यक्रमासाठी अजित पवार यांचा ताफा जात असताना या वेळी आळे फाटा चौकात अजित पवारांना मराठा आंदोलकांकडून काळे झेंडे दाखवून त्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या गेल्या. या वेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!