ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शिंदे गटाचे आमदार बाबर यांचे निधन

मुंबई : वृत्तसंस्था

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी मानले जाणारे शिवसेना आमदार अनिल बाबर यांचे निधन झाले आहे. खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे त आमदार होते. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. न्यूमोनिया झाल्याने त्यांना सांगलीतील रुग्णालयात मंगळवारी दुपारी दाखल करण्यात आले होते. तसेच बाबर यांना पाणीदार आमदार असेही म्हटले जात होते.

अनिल बाबर हे खानापूर-आटपाडी मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार होते. एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर अनिल बाबर हे 40 आमदरांसह गुवाहटीला गेले. अनिल बाबर हे खानापूर-आटपाडी मतदार संघाचे विधानसभत प्रतिनिधित्व करत होते.. अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर हेही राजकीय जीवनात सक्रिय आहेत.

सांगलीच्या खानापूर विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार होते. राष्ट्रवादी पुरस्कृत सदाशिव पाटलांचा अनिल बाबर यांनी 2019 ला पराभव केला होता. अनिल बाबर यांचा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना असा राजकीय प्रवास आहे. अनिल बाबर हे 4 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. 1990, 1999, 2014, 2019 ला आमदारकीला ते निवडून आले होते. अनिल बाबर यांनी यशवंत सहकारी साखर कारखान्याचे (खानापूर) अध्यक्षपद 1991 मध्ये भूषवले होते, तर 2001 मध्ये ते सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!