मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही वर्षापासून अनेक बड्या नेत्यांनी ईडी चौकशी सुरु आहे. ईडीच्या या कारवाईवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केल्याने राजकीय चर्चा सुरु झाली आहे.
राज्यात आणि देशात विरोधी पक्षांच्या नेत्यांना केंदीय तपास यंत्रणा ईडीकडून जोरदार कारवाई सुरु आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केली आहे. तर दिल्लीचे मुख्यमंत्री यांना देखील ईडीने समन्स बजावलं आहे.
देशात सुरु असलेलं अशा प्रकारचं राजकारण भविष्यात भाजपला देखील परवडणार नाही. कारण सत्तेचा अमरपट्टा कुणीही घेऊन आलेलं नाही. उद्या सत्ता गेली तर काय होईल याचा विचार सत्ताधाऱ्यांनी करायला पाहिजे. इंदिरा गांधींचा दाखला देत तुम्ही हे असं किती दिवस करणार, असं राज ठाकरे यांनी म्हटलं. उद्या सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. मुंबईतील टोलनाक्यावरील आम्ही जे चित्रण केलंय ते त्यांच्या समोर ठेवणार आहे. टोलमधून जमा होणाऱ्या पैशाबाबत मोठा गौप्यस्फोट राज ठाकरे यांनी केला आहे. टोलचा पैसा अनेक पक्षांना पक्ष निधीसाठी वापरला जातो. मलाही ऑफर आली होती, मी म्हटलं इथेच मारेल तुला, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.