ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मी कुणालाही सोडणार नाही ; ठाकरेंची घणाघाती टीका

मुंबई : वृत्तसंस्था

ठाकरेंच्या पक्षातून मागील वर्षी ४० आमदार पक्ष सोडून गेल्यावर आता ठाकरे परिवारासह मैदानात उतरले आहे व पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यावर जोर देत दौरे सुरु केले आहे. सध्या कोकणाच्या दौऱ्यावर ठाकरे आहे. त्यांनी सोमवारी धूत पापेश्वर मंदिरात जाऊन सपत्नीक दर्शन घेतले. त्यानंतर मंदिर परिसरात सुरू असणाऱ्या विकासकामांचीही पाहणी केली. त्यानंतर राजापूर येथे आयोजित सभेत ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्यावरील ईडी कारवाईवरून सत्ताधारी आणि सरकारी अधिकाऱ्यांवर चांगलेच टीकास्त्र डागले.

ते म्हणाले की, राजन साळवी यांच्याविरोधात कुणी तक्रार केली? काय मिळाले तुम्हाला? सत्ता येते आणि जाते. अधिकाऱ्यांना सांगतो, वेळ बदलते. मी कुणालाही सोडणार नाही. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना राजन साळवी यांच्या विरोधातील पैसे वाटणाऱ्या उमेदवारावर कारवाई करण्याचेही आव्हान दिले.

विरोधी पक्षांच्या नेत्यांविरोधात तक्रार करून अडचणीत आणणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे. आमच्या राजन साळवी यांच्या विरोधात कुणी तक्रार केली? काय मिळाले त्यांना? सत्ता येते आणि जाते. वेळही बदलते. आम्ही कुणालाही सोडणार नाही, असे उद्धव ठाकरे अधिकाऱ्यांना दम देताना म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी यावेळी एसीबीने राजन साळवी यांच्या घरातील सामनाच्या लावलेली किंमतही वाचून दाखवली. या यादीवर सावंत नामक व्यक्तीची स्वाक्षरी आहे. ते म्हणाले की, मी राजन साळवी यांना धन्यवाद द्यायला आलो आहे. सुशांत चव्हाण तुम्ही महाराजांच्या मूर्तीची किंमत केली. किती तर 5 हजार रुपये. बाळासाहेबांचा फोटो व खुर्ची याची किंमत 10 हजार रुपये. माझ्या वडिलांची किंमत मिंध्याना कळली, पण तुम्हाला नाही कळली. सर्वांचे दिवस फिरतात हे लक्षात ठेवा आता त्यांचे दिवस आहेत. उद्या आमचे येतील. तुमच्या 7 पिढ्या आल्या तरी या वस्तुंची किंमत तुम्हाला करता येणार नाही. मिंध्यांना त्यांच्या वडिलांची किंमत कळली नाही. त्यामुळे त्यांनी माझा बाप चोरला आहे, असे ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!