---Advertisement---

राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षपदी दिलीप सिद्धे तर शहराध्यक्षपदी स्वामी

By team
On: February 5, 2024 4:09 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या तालुकाध्यक्षपदी माजी उपनगराध्यक्ष दिलीप सिद्धे यांची तर शहराध्यक्षपदी युवा नेते शिवराज स्वामी यांची निवड करण्यात आली आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे पाटील व प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांच्या शिफारशीनुसार या निवडी करण्यात आल्या.सिद्धे हे गेल्या ४० वर्षापासून अक्कलकोट शहर व तालुक्यात राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांच्या कुटुंबात एकेकाळी नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष तसेच तीन नगरसेवक पदे होती.त्यांचा तालुक्यात दांडगा जनसंपर्क आहे त्यामुळे सिद्धे यांची निवड करण्यात आली आहे.शहराध्यक्षपदी शिवराज स्वामी यांची वर्णी लागली आहे.

स्वामी यांच्या मातोश्री महानंदा स्वामी यापूर्वी अक्कलकोट नगरपालिकेच्या नगराध्यक्षा होत्या. दहा काँग्रेस, दहा भाजप नगरसेवक असताना एक राष्ट्रवादीचा नगरसेवक असताना त्यांनी नगराध्यक्षपद भूषविले होते.अनेक वर्षापासून ते राष्ट्रवादीचे कट्टर समर्थक आहेत. त्यामुळे त्यांची निवड करण्यात आली आहे तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी बादोले बुद्रुक येथील युवा कार्यकर्ते शांतकुमार सलगरे यांची निवड करण्यात आली.गेल्या अनेक वर्षांपासून सलगरे हे राष्ट्रवादीमध्ये सक्रिय आहेत. सोलापूर येथे झालेल्या एका कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंके,राजेंद्र हजारे,उत्तम जानकर,बाळू बंडगर आदी उपस्थित होते.आगामी लोकसभा, विधानसभा, नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची ताकद दाखवून देण्यात येईल. नव्या निवडी झाल्या असल्या तरी इतर तालुका,शहर व युवकची नूतन कार्यकारिणी लवकरच जाहीर करणार आहे,असे तालुकाध्यक्ष सिद्धे यांनी सांगितले.या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!